gaabhara aani kusumagrajanchya itar kavita

गाभारा 

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या समया आहेत,
हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा,
आणि असे इकडे या
पाहिलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तसं नाही,
एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालू आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तूर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असतं,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज
गुलजार यांनी कुसुमाग्रजां च्या  कवितांचा खूप सुरेख अनुवाद  केलेल्या नझ्मां चा इथे आस्व्वाद घे घ्या … सोबत सौमितर यांच्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कविता मराठीत हे ऐकायला मिळतील … 


No comments:

Becoming a Parent Is a Gift

I found this very touching article on npr.org. Just felt like sharing it with everyone ... Becoming a Parent Is a Gift by Chris Hun...