शेपटा एक धमाल कविता

https://misalpav.com/node/2638


शेपटा 
-अ‍ॅड्व्होकेट रत्नपारखी  
एस. एस. सी. ला बसलो होतो प्रथम परीक्षेस
एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश
पेपर पहिला , घंटा पहिली क्षण उस्सुक्तेचा ,
माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशी चा .
मानेला ती देऊनी झटका नकळत सवयीने ,
लिहू लागली पेपर मधली पानावर पाने .
मऊ रेशमी मोहक काळा , शेपटीचा भार
तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर ,
तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात
एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात
शेवटची ती घंटा झाली , आलो भानावरी
कळले आता अपुले जिने गावी खेडयावरी.
शेती वरती मोते वरती माझी उपजीविका ,
शिक्षणास मी आज पारखा , शुभदा प्राध्यापिका
केसांनी त्या गळा कापला अलगद जी माझा ,
परी बैलांच्या पिळून शेपटा जगतो हा राजा

स्पृहा जोशी नि ती खूप छान सादर केलीये या विडिओ मध्ये 

Becoming a Parent Is a Gift

I found this very touching article on npr.org. Just felt like sharing it with everyone ... Becoming a Parent Is a Gift by Chris Hun...