http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Saptarang&category=Saptarang_Paryatan
(डॉ. वर्षा जोशी)
तामिलानादूत कन्याकुमारीजवळ तिरुनलवेली, तंजावरजवळ दारासुरम आणि पॉंडीचेरीजवळ चिदंबरम येथे संगीत स्तंभ असलेली मंदिरे आहेत. भौतिकशास्त्रीय तत्त्वांवर आधारलेले हे स्तंभ भारतीय संस्कृतीचा दुर्मिळ ठेवा आहेत. त्यांची जपणूक झाली पाहिजे. भारतभ्रमणाचा संकल्प सोडल्यानंतर नुकताच दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्याच्या पर्यटनाचा योग आला. संगीत आणि विशेषकरून "वाद्यांमधील विज्ञान' यामध्ये खूप रस असल्याने तेथील मंदिरांमधील संगीत स्तंभाबद्दल (म्युझिकल पिलर्स) कुतूहल होतं. कन्याकुमारीजवळील सुचिंद्रम, मदुराईमधील मीनाक्षी आणि तिरुअनंतपुरममधील श्रीपद्मनाभ या सर्व मंदिरांमधील संगीतस्तंभ पाहिले; पण त्यांची संख्या मर्यादित होती. कन्याकुमारीजवळ साधारण शंभर किलोमीटरवरील तिरुनलवेली या ठिकाणी असे उत्तम स्थितीतील पुष्कळ स्तंभ आहेत असे समजल्यानंतर त्या ठिकाणी मुद्दाम गेलो. नेलियाप्पर हे शंकराचे मंदिर त्या ठिकाणी आहे. पर्यटकांपासून दुर्लक्षित असे हे मंदिर आहे. पांड्या वंशाच्या राजांनी सातव्या शतकात स्थापना केलेले हे मंदिर आणि त्यातील नादमणी मंडपम या सभागृहातील संगीतस्तंभ म्हणजे कला, भौतिकशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांचा अभूतपूर्व संगम आहे. एका समूहामध्ये अनेक स्तंभ असे दहा समूह म्हणजे एकूण १६१ स्तंभ या मंडपात आहेत. असे दोन समूह तेथील अम्बेच्या मंदिरातही आहेत. या स्तंभांचे तीस श्रुती, गण आणि लय असे वर्गीकरण केले जाते. श्रुती प्रकारामध्ये स्तंभातून सप्तसूर निर्माण होऊ शकतात. गण प्रकारात विशिष्ट रागांना लागणारे स्वर निर्माण होतात, तर लय प्रकारात ताल निर्माण होतो. तिरुनलवेलीमधील खांब हे जास्त करून श्रुती आणि लय प्रकारात मोडतात. श्रुतिस्तंभावर वादन करता येते. तशा ध्वनिफिती उपलब्ध आहेत. लयस्तंभावर आघात केला की मृदंगाचा, तसेच काहींमधून तबल्याचा आवाज ऐकू येतो. नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील डॉ. डिसा व डॉ. परमेश्वरन या भौतिकशास्त्रातील प्राध्यापकांनी (कै.) डॉ. हेमचंद्र मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तंभांवर संशोधन केले आहे. काही विशिष्ट स्वरसमूह असलेल्या ऋचा स्तंभ असलेल्या मंडपात गायल्या गेल्या. त्याच नंतर वीणेवर वाजविल्या. खांबांवर "कॉंटॅक्ट मायक्रोफोन' लावून जरूर ते इलेक्ट्रॉनिक परिपथ (सर्किट्स) वापरून त्या स्वरांमुळे एकनादाने (रेझोनल्स) वाजणाऱ्या स्तंभांमधील स्वरांचे ध्वनिमुद्रण केले. स्वरस्तंभामधून वीणेप्रमाणे उमटलेले ऐकणे हा रोमांचकारी अनुभव असतो. याच्याही ध्वनिफिती उपलब्ध आहेत. हे स्तंभ संपूर्णपणे भौतिकशास्त्रीय तत्त्वांवर आधारित आहेत. स्तंभांवरील नक्षीसुद्धा त्यांची वारंवारिता ठरवण्यात महत्त्वाची ठरते. सारख्याच लांबीच्या आणि जाडीच्या दोन स्तंभांमधील स्वरांची वारंवारिता ही त्यावरील नक्षीमुळे भिन्न असल्याचे आढळले आहे. या मंदिरात खांबांचा एक समूह असा आहे, की त्यामधून जलतरंगासारखा नाद ऐकू येतो. श्री शिवशंकर म्हणजे नृत्य-गायन या कलांची देवता. पूर्वीच्या काळी या मंदिरांमध्ये नृत्य-गायन सादर होत असताना, मृदंग, तबला वाजत असताना पाषाणालाही कंठ फुटावा अशी योजना करणाऱ्या संगीत, भौतिकशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र, शिल्पकला या सगळ्यांची उत्तम जाण असणाऱ्या त्या प्रतिभावंत कलाकारांना मनोमन मुजरा करूनच नेलियाप्पर मंदिरातून आम्ही बाहेर पडलो. दुसरे आकर्षण होते, तंजावरपासून ३४ किलोमीटरवर असलेल्या दारासुरम येथील ऐरावतेश्वर मंदिराचे. रथाचे रूप दिलेल्या मंदिराच्या सभामंडपाचे घोडे, हत्ती, चाक हा शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे. रामायण, महाभारतातील कथा यावर अतिशय सुरेख कोरल्या आहेत. भरतनाट्यम्मधील मुद्रा, जिम्नॅस्टिक्समधील विविध प्रकारही कोरलेले आहेत. हे मंदिर दुर्लक्षित अशा अवस्थेत आहे. त्याचा काही भाग पडायलाही आलेला आहे. आता युनेस्कोने तो भाग व्यवस्थित करण्याची जबाबदारी उचलली आहे, अशी माहिती मिळाली. या मंदिरातले आमचे आकर्षण होते ते म्हणजे मंदिराबाहेर असलेल्या पायऱ्या. या पायऱ्यांसाठी वापरलेला दगड मंदिरासाठी वापरलेल्या दगडांपेक्षा अगदी भिन्न आहे. या पायऱ्यांवर बाजूला आघात केला की सप्तसूर उमटतात. दुःखाची गोष्ट अशी, की लोकांनी पायऱ्यांवर सतत आघात केल्याने त्या आता मोडकळीला आल्या आहेत आणि म्हणून त्या आता जाळीमध्ये कुलूपबंद करून ठेवण्यात आल्या आहेत. मीनाक्षी मंदिरामधील संगीतस्तंभही यामुळे लोखंडी जाळीमध्ये कुलूपबंद आहेत. संगीतखांब, संगीत पायऱ्या अशा गोष्टी आता निर्माण होणे अशक्य आहे, पण आपला हा विज्ञान आणि कला यांच्या संगमाचा ठेवा आपण जपूही शकत नाही, त्याकडे आपले इतके दुर्लक्ष होऊ शकते, हे पाहून विषाद वाटतो. पॉंडिचेरीपासून साधारण चौसष्ट किलोमीटरवर चिदंबरम् मंदिराचे महत्त्व आणखी वेगळे आहे. बहुतेक शंकराच्या मंदिरांमध्ये आपल्याला शिवलिंग दिसते; पण या मंदिरात शंकर नटराजाच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. आनंदतांडव या मुद्रेतील ही नटराजाची मूर्ती आहे. उत्पत्तीसाठी ब्रह्मा, पालनासाठी विष्णू आणि विनाशासाठी शिव, असे आपण नेहमी म्हणतो; पण या मूर्तीमध्ये या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे जे "ब्रह्म'- त्याचे प्रतिनिधित्व आहे. वरच्या उजव्या हातातील डमरू हा निर्मिती किंवा उत्पत्तिदर्शक, विश्वाचा ताल निर्माण करणारा आहे. वरच्या डाव्या हातात विनाश करणारा मृत्युदर्शक अग्नी आहे. मूर्तीमध्ये या दोन्ही हातांचा सांभाळलेला सुरेख तोल जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश यामधील तोल दर्शवितो. या दोन्ही हातांच्या मधोमध असलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर या दोन्हींचा आनंद किंवा दुःख यापलीकडचा एक शांत, अलिप्त भाव आहे. दुसरा उजवा हात पालनकर्त्याचा, शांततादर्शक आहे, तर डावा हात वर उचललेल्या पायाकडे निर्देश करणारा, मायामोहाच्या जंजाळातून बाहेर काढणारा आहे. दुसरा पाय अज्ञानाच्या राक्षसावर ठेवलेला आहे. अध्यात्म्याचे इतके सुरेख चित्रण कलेमधून क्वचितच आढळेल. विश्वाच्या उत्पत्तीपासून सुरू झालेले हे नृत्य विश्वाच्या अंतापर्यंत चालणार, किंबहुना हे नृत्य थांबेल तेव्हा विश्वाचा अंत होणार. भौतिक शास्त्रीयदृष्ट्या याचा अर्थ उत्तम समजू शकतो. प्रत्येक अणूमध्ये हे ऊर्जानृत्य चालू असते. विश्वकिरणांचा वर्षाव होत असतानाही कणांचा जन्म होणे आणि ते पुन्हा ऊर्जेत विलीन होणे, हे चालूच असते. तो जेव्हा थांबतील तेव्हा विश्वाचा अंत, हे तर भौतिकशास्त्रीय सत्य आहे. चिदंबरम् मंदिर हे पंचमहाभूतांपैकी आकाशाचे प्रतिनिधित्व करते. आकाश किंवा अवकाश (स्पेस) अफाट, अनंत आहे आणि प्रत्येक अणुरेणूमध्येही ते आहे. इथे शिव हा निराकार, अनंत होतो आणि म्हणूनच येथील एका मंदिरात मूर्ती नसून, नुसतीच बिल्वपत्रांची माला आहे. निसर्गात, प्रत्येक प्राणिमात्रात असलेले चैतन्य, ऊर्जा म्हणजेच परमेश्वर, हे दर्शविणारे हे मंदिर आहे.

0 comments:
Post a Comment