सकल मधला हां लेख वाच्ला । "सदोष 'duct' मुले पाव्साल्यत विजेचा बोज्वारा" आशा आशयाचा । पण किती अड़चन hoela ह्याची कल्पना नही करवट॥ लेख वाचा
पुणे, ता. १९ - शहरातील विविध रस्त्यांवर तयार करण्यात येणाऱ्या पावसाळी "डक्ट'च्या सादोष रचनेमुळे येत्या पावसाळ्यात शहरातील वीजपुरवठ्याचा बोजवारा उडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ........हे "डक्ट' तयार करताना त्यामध्ये जमिनीखालील वीजवाहिन्यांचा विचारच करण्यात आलेला नाही, असे या क्षेत्रातील तंत्रज्ञांचे मत असून वीजपुरवठा खंडित झाल्यास बिघाड शोधून काढणे जवळपास अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात चौकशी केली असता रस्ते खोदाईमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांना धक्का लागल्याने बहुसंख्य बिघाड निर्माण झाल्याचे आढळले, असे हे काम करणाऱ्या तंत्रज्ञांनी सांगितले. महापालिकेने शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यांच्या कडेने कॉंक्रिटचे पावसाळी "डक्ट' तयार करण्यात येत आहेत. मात्र, त्याच्या रचनेबाबत "महावितरण'कडून आक्षेप घेण्यात येत आहे. बहुसंख्य "डक्ट'ची रुंदी अपुरी आहे. त्यामुळे त्यामध्ये उतरून वीजपुरवठ्यातील बिघाडाची दुरुस्ती करण्यात अडचणी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर या "डक्ट'मधून पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या जलवाहिन्यांच्या खाली वीजवाहिन्या दबल्या असल्याचे त्यांनी "सकाळ'च्या प्रतिनिधीस दाखवून दिले. अशा वेळी येथे दुरुस्ती कशी करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. जमिनीखालील वीजवाहिन्यांसाठी या "डक्ट'मध्ये छोट्या "पाइप'ची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ते अत्यंत अरुंद असून त्यातून वेगवेगळ्या क्षमतेच्या वीजवाहिन्या एकत्र नेणे कायमचे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेचे निकष आणि कायद्यानुसार वेगवेगळ्या क्षमतेच्या वीजवाहिन्यांमध्ये किमान सहा ते आठ इंच अंतर ठेवणे आवश्यक ठरते. परंतु, या रचनेत ते जवळपास अशक्य असल्यामुळे एका वाहिनीत बिघाड झाला, किंवा ठिणग्या उडाल्या, तर दुसऱ्या वीजवाहिनीलाही धोका पोचण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास "महावितरण'तर्फे "व्हायब्रेशन'च्या तत्त्वावर नेमका बिघाड शोधून काढण्याचे तंत्र वापरण्यात येते. मात्र, या "डक्ट'च्या रचनेत वीजवाहिन्या "पाइप'मध्ये येणार असल्याने या पद्धतीचा उपयोग होत नसून बिघाड शोधून काढणे अवघड ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे, तसेच या "डक्ट'मध्ये विशिष्ट अंतरावर "मॅन होल' ठेवण्याची गरज आहे. बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी वारंवार कॉंक्रिटचे बांधकाम फोडण्याची वेळ येईल आणि दुरुस्तीला किमान तिप्पट वेळ लागेल, अशी भीती आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदाचा पावसाळा महापालिकेप्रमाणेच "महावितरण'च्या दृष्टीनेही आव्हान ठरणार आहे. पावसाळ्यात वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड निर्माण होतात. विशेषतः पाणी जमिनीत मुरल्यावर वीजवाहिन्यांमध्ये अनेक बिघाड होतात. मात्र, या संदर्भात महापालिकेस कळवूनही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले. यातून मार्ग निघाला नाही, तर पावसाळ्यात विजेअभावी पुणेकरांचे अतोनात हाल होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात महापालिकेच्या पथ विभागाचे माधव लाटकर म्हणाले, ""अरुंद रस्त्यांवर या "डक्ट'साठी प्रत्येक ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र, "महावितरण', "बीएसएनएल' अशा यंत्रणांशी समन्वय साधून काम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.'' ******************************************** पावसाळी "डक्ट'च्या रचनेवर घेण्यात आलेले आक्षेप - रुंदी अपुरी- काम करण्यात अडचणी. - वीजवाहिन्या "पाइप'मधून बिघाड शोधून काढण्यात अडचणी. - काही ठिकाणी वीजवाहिन्या पाण्याच्या वाहिन्यांखाली दबल्या. - कॉंक्रिट फोडावे लागण्याची भीती. बिघाड दुरुस्त करण्यास विलंब ******************************************** समन्वयाची गरज महापालिका आणि महावितरण या दोघांच्याही सेवा अतितातडीच्या असल्यामुळे त्यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी गेल्या महिन्यात बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही महापालिकेकडून रस्ते खोदाईची परवानगी देताना "महावितरण'ला कळविण्यात येत नाही. परिणामी "जेसीबी'चा धक्का लागून वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याचे आणि सारा परिसर अंधारात बुडण्याचे सात ते आठ प्रसंग गेल्या आठवड्यात घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. ********************************************
Friday, April 20, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment